शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दर घसरणीवर थेट अनुदानाचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:33 IST

शासनाकडून चाचपणी; कांदा विक्री, दराची माहिती मागविली

- अरुण बारसकर सोलापूर : वाहतूक अनुदान देऊनही कांद्याचे दर वाढत नसल्याने राज्यभरातील शेतकरी शासनावर रोष व्यक्त करीत असल्याने आता थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकार चाचपणी करत आहे़ बाजार समित्यांकडून नोव्हेंबर महिन्यातील कांदा खरेदीची माहिती राज्याच्या पणन विभागाने मागविली आहे.यावर्षी कांद्याची आवक त्यापटीत वाढली नसतानाही दर मात्र घसरले आहेत. आॅक्टोबर महिन्यापासून कांदा दराची घसरण वरचेवर सुरूच आहे. पणन खात्याने राज्यातील बाजार समित्यांना नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याची आवक, शेतकरी संख्या व मिळालेला दर याची माहिती सहायक निबंधकांकडे देण्यास सांगितले आहे. सहायक निबंधकांनी ही माहिती जिल्हा उपनिबंधकांमार्फत राज्याच्या पणन विभागाकडे पाठवायची आहे.शासन अन्य राज्यांत विक्रीसाठी घेऊन जाणाºया शेतकरी उत्पादक कंपनी, शेतमाल सहकारी संस्था, शेतकरी गटांना पणन मंडळामार्फत वाहतूक अनुदान देते. वाहतूक अनुदान देऊनही कांदा दरात वाढ होत नसल्याने शासन शेतकºयांना अनुदान देण्याचा विचार करीत आहे. गेल्या आठवड्यात याबाबत बैठक झाली होती.गडबड होऊ नये म्हणून...नोव्हेंबर महिन्यातील बाजार समित्यामधील कांदा विक्रीचे रजिस्टर सहायक निबंधकांनी तपासणी करुन शेवटच्या पानावर तपासणी केलेला शेरा मारायचा आहे. असे केल्याने कांदा अनुदान जाहीर केल्यानंतर कोणाला गडबड करण्याची संधी मिळणार नाही, याची दक्षता पणन महामंडळ घेत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.कांद्याच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती असल्याने शासन थेट शेतकºयांना अनुदान देण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच कांदा विक्रीची माहिती बाजार समित्यांकडून मागितली आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होईल.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री़

टॅग्स :onionकांदाMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी