वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा त्रास

By Admin | Updated: December 14, 2015 02:55 IST2015-12-14T02:55:40+5:302015-12-14T02:55:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांना एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाल्याने रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Dilasa-Patil has heart problems | वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा त्रास

वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा त्रास

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांना एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाल्याने रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी सकाळी कात्रज दूध डेअरीमध्ये कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्र मात भाषण करतेवळी वळसे-पाटील यांना अचानक छातीत कळ आल्याने ते स्टेजवरच कोसळले. मंचावर उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना सावरले. घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने एका खासगी वाहनाने वळसे-पाटील यांना भारती विद्यापीठ रु ग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना रूबी रु ग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी कात्रज ते भारती विद्यापीठापर्यंतच्या रस्त्यावरची वाहतूक थांबवून वाहनाला रस्ता मोकळा करून दिला. वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगितले. वळसे-पाटील यांच्यावर दोन वर्षांपूर्वी अ‍ॅँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी बसविण्यात आलेल्या ‘इनकार्डिआक डिव्हाईस’मुळे हृदयाचे ठोके अनियमित पडू लागल्याने त्रास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभाताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी रुग्णालयात वळसे-पाटील यांची विचारपूस केली

Web Title: Dilasa-Patil has heart problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.