राज्यात ५० लाख नागरिकांना डिजिटल उतारे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:59 PM2019-06-26T12:59:06+5:302019-06-26T13:01:45+5:30

राज्य सरकारकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पध्दतीने देण्याची भूमिका आहे..

Digital satbara given to 50 million citizens in the state | राज्यात ५० लाख नागरिकांना डिजिटल उतारे वाटप

राज्यात ५० लाख नागरिकांना डिजिटल उतारे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे महसुली विभागात सर्वाधिक वाटप : तर मुंबई उपनगरात ४७६५ सर्वात कमीदैनंदिन उतारे वाटपाची संख्या ही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक

पुणे : राज्य सरकारकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पध्दतीने देण्याची भूमिका आहे. त्यादृष्टीने भूमि अभिलेख विभागाकडून सातबारे, ८ अ आणि ई फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील ५० लाख ६६ हजार १९७ नागरिकांना डिजिटल सातबारे, ८ अ आणि ई फेरफार देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. 
राज्यातील पुणे महसूल विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक सातबारे, ८ अ आणि ई फेरफार वाटप करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दैनंदिन उतारे वाटपाची संख्या ही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक असल्याचे रामदास जगताप यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यानिहाय डिजिटल वाटप केलेले उतारे
कोल्हापूर ४६४२३३, सांगली ४२७९१७, पुणे ४०७६११, बुलढाणा ३०७९८४, जळगाव ३०२८३७, सातारा २९२९२१, अहमदनगर २८५८३८, नाशिक २,४२,८५९, सोलापूर २,१८,४७६, यवतमाळ १,८६,२६४, रायगड १,८४,४८६, चंद्रपूर १,५७,४६०, बीड १,४७,२६२, नांदेड १,२७,९९२, धुळे १,१८,७८०, ठाणे १,१६,३८८, नागपूर १,१०,०५५, वर्धा १,०५५३१, भंडारा ९९,१५०, रत्नागिरी ८१,३१०, अकोला ७८,६१९, गोंदिया ७४,६९४, लातूर ७३,९१९, गडचिरोली ७१,७०४, अमरावती ७०,८३५, जालना ६९,६०२, परभणी ६१,७८०, पालघर ५४,२१२, हिंगोली ३३,२४४, उस्मानाबाद ३०,१०१, औरंगाबाद २१,९०४, वाशिम १८,१६६, नंदूरबार १७,२८८ आणि मुंबई उपनगर ४७६५ असे एकूण ५० लाख ६६ हजार १९७ सातबारे, ८ अ आणि ई फेरफार वाटप करण्यात आल्याचे रामदास जगताप यांनी सांगितले.
.........
डिजिटल सातबारा उताऱ्यामुळे हे होणार फायदे 
* सातबारा उतारे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. 
* डिजिटल सातबारा कायदेशीर असणार आहेत.
* हव्या त्या वेळी नागरिकांना सातबारा मिळणार आहे.

Web Title: Digital satbara given to 50 million citizens in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.