दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का? सुनील तटकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:24 AM2017-08-20T00:24:00+5:302017-08-20T00:24:15+5:30

राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतक-यांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे

 Did ten farmers lose their debt? Sunil Tatkare's question | दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का? सुनील तटकरे यांचा सवाल

दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का? सुनील तटकरे यांचा सवाल

Next

मुंबई : राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकºयांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतकºयांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे, असे आव्हान देत सत्ताधाºयांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी शेतकºयांची चिंता करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. शेतकºयांचे कर्ज माफीसाठी दहा लाख अर्ज आल्याचे सहकारमंत्री सांगत आहेत. त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली?, असा सवाल तटकरे यांनी केला. शेतकºयांनी ध्वजारोहण करण्यास विरोध केला नाही तर पालकमंत्र्यांना विरोध केला होता. मात्र हे समजून न घेत मुख्यमंत्री शेतकºयांनाच देशद्रोही म्हणत आहेत, हे दुर्दैवी आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. तावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे. निकालाचा घोळ करुन सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला. कुलगुरूंना केवळ रजेवर पाठवून चालणार नाही तर हकालपट्टीच केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तटकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. सरकारचा भाग असूनही शिवसेना जबाबदारी मात्र घेत नाही. अधिनेशन संपून आठवडा झाला तरी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्या चौकशीचे आदेश निघालेले नाहीत. त्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title:  Did ten farmers lose their debt? Sunil Tatkare's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.