शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Dhule, Ahmednagar Municipal Election Results: पुन्हा देवेंद्र प्रसन्न... धुळे, नगरमध्ये भाजपाची मुसंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:47 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हातात हात आणि शिवसेनेनं सोडलेली साथ, अशा परिस्थितीतही भाजपाने धुळे आणि नगरमध्ये मुसंडी मारली आहे. 

ठळक मुद्दे२०१३ साली झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. अहमदनगरमध्ये भाजपाचे फक्त नऊ नगरसेवक होते. या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत शिवसेनेला आणि आघाडीला जोर का झटका दिला आहे.

महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुलण्याचा सिलसिला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळतोय. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हातात हात आणि शिवसेनेनं सोडलेली साथ, अशा परिस्थितीतही भाजपाने धुळे आणि नगरमध्ये मुसंडी मारली आहे. 

२०१३ साली झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. अहमदनगरमध्येही त्यांचे फक्त नऊ नगरसेवक होते. परंतु, आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपाने धुळ्यात ३० जागांचा टप्पा ओलांडला आहे, तर नगरमध्ये १९ जागांवर आघाडी घेतलीय. अनिल गोटे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानं काँग्रेस आघाडीसह, शिवसेनेच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, लोकसंग्राम पक्षाला मतदारांनी साफ नाकारलंय. त्यातून अनिल गोटेंबद्दलची नाराजी दिसते. त्यामुळे त्यांचं बंड भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचं मानलं जातंय. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मतदारांचा विश्वास, या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाला आहे. मराठा आरक्षणही भाजपाला फळल्याचं जाणकारांचं मत आहे. 

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये त्रिशंकू निकाल लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे अंतिम आकडे कसे असतात आणि त्यानंतर काय समीकरणं पाहायला मिळतात, याबद्दल उत्सुकता आहे. 

LIVE UPDATES साठी खालील लिंकवर क्लिक करा...  

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाcongressकाँग्रेस