शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ढोल बाजे रे..

By admin | Updated: September 15, 2014 23:03 IST

सब कुछ बाप्पासाठी टाइम मॅनेजमेंट करणा:या तरुणाईला गणोशोत्सव संपल्यावर खरे वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे.

सब कुछ बाप्पासाठी टाइम मॅनेजमेंट करणा:या तरुणाईला गणोशोत्सव संपल्यावर खरे वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. गणोशोत्सवात आलेल्या स्ट्रेस आणि टायर्डनेसला मोकळी वाट मिळते ती नवरात्रोत्सवात. सध्या परीक्षा सुरू असल्याने कट्टय़ावरील गप्पांना थोडा ब्रेक बसला आहे. गणोशोत्सवाच्या सुटीनंतर गाठीभेटीचे कॉज काय असावे, तर नवरात्रोत्सव. इमोशनला मोकळी वाट करून देण्याचा नामी मार्ग म्हणजे नृत्य. तेही ग्रुपने केले जात असल्याने बरोबर की चूक, अशी कोणतीही भीती नाचणा:यांच्या मनी नसते. त्याला कारण मॉब सायकॉलॉजी. 
ठाणो - हल्ली सोसायटय़ांच्या गच्चीवरही गरबा रंगतो. भव्य आयोजनात सुरक्षिततेची हमी विशेषत: तरुणींना नसते. गच्ची व गल्लीतल्या गरब्यात घरची मंडळी मुलींना बिनधास्त सहभागी होण्यास अनुमती देतात.एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रियाही त्यात सहभागी होतात. वेगवेगळे ड्रेस आणि लेझर टिप:यांची जादू तरुणाईला मोहिनी घालून त्यांच्या आनंदात भर टाकणारी असली तरी  गरबा खेळणा:या तरुणाईला आजच्या नवरात्रोत्सवाविषयी नेमके  काय वाटते, हे जाणून घेण्याचा 
प्रयत्न करण्यासाठी थेट त्यांच्याशी संवाद साधला..
 
मानसशास्त्रचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डोंबिवलीतील सिद्धी वैद्य या एका मानसोपचारतज्ज्ञाच्या रुग्णालयात समुपदेशकाचे काम करतात. त्यांनी सांगितले की, टिळकनगरातील गणोशोत्सवाच्या लेझीम पथकात मी सहभाग होते. त्यानंतर, अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. गणोशोत्सव व नवरात्रोत्सवात जो गॅप पडतो, तो भरून काढण्यासाठी उत्सव हे एकमात्र निमित्त असते. त्यानिमित्ताने आम्ही मित्रमैत्रिणी पुन्हा भेटतो. 
 
1लेझीम पथकातील आम्ही 4क् जण  नवरात्रोत्सवाला एकत्र येतो. दिवस व वेळ ठरवून घेतली जाते. गरबा खेळण्यासाठी लागणारा विशिष्ट पेहराव करत नाही. कारण, अनेक जणी नोकरी करणा:या व शिक्षण घेणा:या आहेत. ग्रुपमधील एखादीलाही ड्रेस घेणो जमले नाही तर ग्रुप एकसारखा दिसून येत नाही. केवळ ड्रेस नाही म्हणून मग कोणी गरब्यात सहभागी होणो टाळू नये, म्हणून आम्ही साध्या कपडय़ांवरच गरबा खेळण्याचा आनंद लुटतो. डोंबिवलीत तिकीट लावून गरब्याचे आयोजन फार मोठय़ा प्रमाणात केले जात नाही.
 
2टिळकनगरातील गरब्यात आम्ही सहभागी होतो. त्या ठिकाणी हुल्लडबाजीला वाव नसतो. सगळे ओळखीचे लोक असल्याने एक आपलेपणा असतो. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नच उद्भवत नाही. लहानपणापासून मी गरबा खेळते. गरब्याचे स्वरूप बदलले असले तरी आम्ही टिप:यांनी गरबा खेळत नाही, तर हातावर टाळी देऊन घिरटय़ा घेत रास नृत्याचा फेर धरतो. आम्हाला पारंपारिक गरबा नृत्य खेळणो आवडते.  अनेक ठिकाणी नव्या फिल्मी गाण्यांच्या चालीवर ढोल बडविले जातात. आम्ही अशा मंडळात गरबा खेळण्यास जात नाही. 
 
लहानपणीच गरबा खेळायचो
बी.कॉम. करून वेब डिझाईनचे शिक्षण घेतलेला देवेंद्र कुलकर्णी सांगतो की, त्याला नवरात्रीचे आकर्षण नाही. लहानपणी गरबा खेळायचो. आता गरबा खेळायला जात नाही. आमच्या घराशेजारील मंडळात गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येत होते. मंडळाने उत्सव साजरा करणो बंद केल्याने घराजवळील उत्सवात सहभागी होण्याची संधी हुकली. 
गणोशोत्सवात मी आवडीने सहभागी होतो. 1क् दिवसांच्या गणोशोत्सवात कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर जो काही प्रचंड शीण आलेला असतो, त्यातून मी बाहेर आलेला नसतो. त्यामुळे पुन्हा नवरात्रीत दमणो मला ङोपणारे नाही. त्यामुळे खेळ टाळतो. मात्र, खेळण्यास माझा विरोध नाही.
 
गरब्यात मिळते नृत्यकलेचे कौशल्य दाखविण्याची संधी
पेंढारकर कॉलेजात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणारी सायली कसब हिने सांगितले की, त्यांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा एक डान्स ग्रुप आहे. नवरात्रोत्सव नृत्याशी संबंधित आहे, त्यामुळे नृत्याची झलक व कसब दाखवण्याची नामी संधी या उत्सवात मिळते. 2क् जणांचा डान्स ग्रुप विविध ठिकाणच्या गरबा नृत्य स्पर्धेत उतरतो. गतवर्षी कल्याणच्या एका गरबा नृत्य स्पर्धेत ग्रुपला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. 
 
या वर्षीही हेच लक्ष्य डोळ्यांसमोर आहे. डान्स ग्रुपला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ड्रेस खरेदी करावे लागतात. एका ड्रेसला दीड हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. ड्रेस खरेदी केल्यावर तो ग्रुपमध्ये आलटून-पालटून वापरतो. आठवडाभर नृत्याची तयारी करावी लागते. मुंबईतील मोठय़ा गरब्यातही सहभागी होऊन बक्षीस पटकावण्याचा ग्रुपचा विचार आहे.
 
सोसायटी टेरेसवरचा गरबा ठरतोय लोकप्रिय
सोसायटीत थाळी वाजवून साउंड सिस्टीमवर गरबा खेळला जातो. सगळे जण गरब्यात सहभागी होतात. सोसायटीतच गरबा खेळला जात असल्याने वेळ व पैशांची बचत होते. गरबा खेळल्याचाही आनंद मिळतो. आम्ही जवळपासच्या इतर सोसायटय़ांमध्ये  जाऊनही गरबा खेळतो. खेळताना एका विशिष्ट समाजाचा पेहराव करून गरबा खेळत नाही, तर सर्वधर्मीय समाजाचा पेहराव करून त्यावर नृत्य करतो.
भारताच्या विविधतेचे प्रदर्शन त्यातून घडवून आणल्याने गेल्या वर्षी आम्हाला गरबा नृत्यातील पहिले पारितोषिक मिळाले होते. नवरात्रोत्सवात नऊ दिवसांच्या रंगांचे पेहराव केले जातात. त्या रंगांचे पेहराव घालण्यासाठी आधीपासून तयारी केली जाते. ज्या रंगांचे ड्रेस नाहीत, ते खरेदी करण्याची तयारी आमच्या घरी सध्या सुरू आहे. विविध रंगी ड्रेससोबतच चणिया-चोलीही खरेदी करतो. 
कधी गरबा ड्रेस, कधी साडी तर कधी चणिया-चोली घालून नृत्यात सहभाग घेतो. गरब्याचा खेळ रात्री रंगतो. त्यामुळे दिवसा अभ्यास व रात्री गरबा असे मॅनेजमेंट असल्याने घरातून कोणताही अटकाव केला जात नाही. टिप:या व हातांवरील दोन्ही पद्धतीचा गरबा मला आवडतो. हातांच्या गरबा नृत्यात विविध स्टेप्स करता येतात. त्यामुळे तो खूप आवडतो. सोसायटीत आऊटसायडरला प्रवेश नसतो. त्यामुळे सेफ वाटते. या वर्षी नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देण्याचा मानस आहे.