शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

“विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाणांचे राइट हँड, लवकरच भाजपात जाणार”; बड्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:17 IST

Dharmarao Baba Atram News: विजय वडेट्टीवारांसोबत झालेल्या बैठकांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे ते नक्कीच भाजपात जाणार, असा ठाम दावा या नेत्याने केला आहे.

Dharmarao Baba Atram News: राज ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता आमची ताकद वाढल्याचा विश्वास महायुतीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर, सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काँग्रेस पक्षातही अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे चित्र आहे. यातच आता विजय वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत, असे विदर्भातील एका बड्या नेत्याने म्हटले आहे.

मीडियाशी बोलताना या नेत्याने काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील तसेच नजीकचे मानले जाणारे अनेक नेते भाजपामध्ये गेले आहेत. ही एक प्रकारची सूचक दिशा आहे की, विजय वडेट्टीवार हे भाजपामध्ये जाणार आणि ही गोष्ट १०० टक्के खरी आहे, असा मोठा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. 

विजय वडेट्टीवार भाजपामध्ये जाण्यासंदर्भात ज्या काही बैठका, चर्चा झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार भाजपामध्ये नक्की जाणार, असे आत्राम यांनी म्हटले आहे. या बैठकांबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र, तेही होते आणि मीही होतो, एवढेच सांगेन. या सगळ्या चर्चा माझ्यासमोर झाल्या. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून काय करणार, तेही भाजपामध्ये जाणार, असे आत्राम यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात सातत्याने महायुती आणि केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील जागांवर मतदान होणार असून, महाविकास आणि महायुती यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण