Hinganghat Burn Case : क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 12:04 IST2020-02-10T11:49:38+5:302020-02-10T12:04:23+5:30
Hinganghat News : पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ही ते यावेळी म्हणाले.

Hinganghat Burn Case : क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही : धनंजय मुंडे
मुंबई : मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे.क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे, असा इशारा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
तर पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ही ते यावेळी म्हणाले.
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे.क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 10, 2020