शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:03 IST

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

Karuna Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीतील खंडणीसंदर्भातील आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंडे यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीची मालमत्ता तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या विविध खटल्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा दावा करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. याबाबत ४ जानेवारी रोजी कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यासह करुणा मुंडे यांचा परळी विधानसभा निवडणुकीतील अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दबाव टाकल्याचा आरोपही करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला असून याबाबत त्यांनी कोर्टात दाद मागितली आहे. करुणा मुंडे यांच्यामार्फत करण्यात आलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात विविध ठिकाणी खटले सुरू आहेत. मात्र या खटल्यांची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप आहे.

करुणा मुंडेंचा निवडणुकीतील अर्ज कसा बाद झाला होता?

परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे दाखल केले होते. या ५८  उमेदवारांपैकी छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. यामध्ये करुणा मुंडे यांच्या अर्जाचाही समावेश होता. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्तीसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावापुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सूचकांनी नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. 

दरम्यान, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या गुडांनी सूचकांवर दबाव टाकून सही बनावट असल्याचा दावा करण्यास सांगितल्याचा आरोप आता करुणा मुंडेंकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडAjit Pawarअजित पवारMumbai High Courtमुंबई हायकोर्टbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण