शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:27 IST

मुंबई : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. धाराशिव, पुणे, ...

मुंबई : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. धाराशिव, पुणे, श्रीगोंदा आदी भागांत हॉटेल, ढाबे तसेच लहान-मोठ्या उद्योगांमध्ये घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने संयुक्तपणे धडक मोहीम सुरू केली असून विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळून येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर  पुण्यातील पिंपळे गुरवमध्ये तब्बल २६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

श्रीगोंद्यात २३ हाॅटेलवर छापे, १३ घरगुती सिलिंडर जप्तश्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) : घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले असून शनिवारी श्रीगोंदा शहरातील २३ हाॅटेलवर छापे टाकले. या कारवाईत ६ हाॅटेल्स व एका दूध डेअरीतून एकूण १३ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गॅस वितरकांनी नियमानुसार, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाटप करावे. तसेच ग्राहकांनी देखील गॅस इतरांना देऊ नये, असे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले.

बेकरी उत्पादनात नाशिकमध्ये ४० टक्क्यांनी घटनाशिक : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि जादा दराने होणारी विक्री यामुळे शहरातील बेकरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या तीन दिवस पुरेल इतके व्यावसायिक सिलिंडर असून, त्यानंतर डिझेलच्या ओव्हनचा वापर करण्यात येईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बेकरी हा पूर्णपणे गॅसवर आधारित व्यवसाय असल्याने उत्पादनासाठी सातत्याने गॅसची गरज भासते. मात्र, सिलिंडरअभावी अनेक व्यावसायिकांनी मर्यादित उत्पादन केले आहे.

मागणी १४०० ची, मिळाले ३०० सिलिंडरमोवाड नागपूर : येथील इंडेन गॅस एजन्सीसमोर नागरिकांची लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. येथे १४०० नागरिकांनी सिलिंडरसाठी मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त ३०० सिलिंडर मिळाले. 

बेकरी उत्पादनात नाशिकमध्ये ४० टक्क्यांनी घटनाशिक : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि जादा दराने होणारी विक्री यामुळे शहरातील बेकरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या तीन दिवस पुरेल इतके व्यावसायिक सिलिंडर असून, त्यानंतर डिझेलच्या ओव्हनचा वापर करण्यात येईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बेकरी हा पूर्णपणे गॅसवर आधारित व्यवसाय असल्याने उत्पादनासाठी सातत्याने गॅसची गरज भासते. मात्र, सिलिंडरअभावी अनेक व्यावसायिकांनी मर्यादित उत्पादन केले आहे.मागणी १४०० ची, मिळाले ३०० सिलिंडर

मोवाड नागपूर : येथील इंडेन गॅस एजन्सीसमोर नागरिकांची लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. येथे १४०० नागरिकांनी सिलिंडरसाठी मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त ३०० सिलिंडर मिळाले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Restaurants Stealing Subsidized Gas: Statewide Raids, Cylinders Seized by Authorities

Web Summary : Statewide raids reveal restaurants illegally using subsidized gas cylinders. Authorities seized cylinders in multiple locations, including 261 in Pimple Gurav, Pune. Bakeries in Nashik face production cuts due to commercial gas shortages. In Mowad, Nagpur, only 300 of 1400 cylinders requested were supplied.
टॅग्स :MumbaiमुंबईNashikनाशिकCylinderगॅस सिलेंडर