‘राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर अमरावतीत दंगा’ देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:36 IST2021-12-03T10:35:31+5:302021-12-03T10:36:00+5:30
Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला.

‘राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर अमरावतीत दंगा’ देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
डोंबिवली : भीमा-कोरेगावमध्ये जे साहित्य मिळाले त्यात चीन, आयएसआय, कशी मदत करत होते हे पोलिसांनी सिद्ध करून अशा डाव्या विषवल्लीचा बुरखा टराटरा फाडला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला.
ज्येष्ठ हिंदुत्ववादी व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या साठीनिमित्त आयोजित सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला.कालपरवापर्यंत स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी जे करत होते ते आता ज्यांना त्यांचे राष्ट्रासाठी दिलेले योगदान समजू न शकणाऱ्या विचारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. ज्या शिवसेनेचे निलंबित खासदार सावरकरांबद्दल बोलले त्यांना काय सांगणार? सावरकरांना लांच्छन लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका, त्यांच्यासारखे होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो.
पुरस्काराला उत्तर देताना शेवडे म्हणाले की, माता पिता गुरू यांचे ऋण फेडता येत नाही. ‘डावी विषवल्ली’ असे नाव ५० व्या पुस्तकाला ते लगेच आकलन व्हावे म्हणून दिले. सगळ्यात जास्त क्रूर कोण, असे म्हटल्यावर हिटलरचे नाव येते, पण माओनीचे नाव का घेतले जात नाही.