देवेंद्र फडणवीस बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल : खासदार संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:14 IST2021-06-11T20:04:21+5:302021-06-11T20:14:18+5:30
Maratha Reservation Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur : देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले.

देवेंद्र फडणवीस बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल : खासदार संभाजीराजे
कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी समाजातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेऊन खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्याची घोषणा गुरुवारी केली.
मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांना विचारला.
त्यावर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल काही बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. बाकी अन्य कोणालाही उत्तर देण्यास मी रास्त समजत नाही. फडणवीस बोलल्यानंतर बघू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असेही त्यांनी सांगितले.