Amruta Fadnavis :"तेरे नाल ही नचणा वे!"; अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच...; हटके लूकची तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:27 IST2023-01-02T14:16:06+5:302023-01-02T14:27:37+5:30
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत.

Amruta Fadnavis :"तेरे नाल ही नचणा वे!"; अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच...; हटके लूकची तुफान चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. आता त्यांचं आणखी एक नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील हटके लूकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. येत्या 6 जानेवारीला 'टी सीरिज'चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे. नवीन गाणं हे बॅचलर्सवर आधारित असल्याचं अमृता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हटके लूकमुळे लोकांमध्ये गाण्याबद्दलची उत्सुकता आहे.
अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 2, 2023
तेरे नाल ही नचणा वे !!
An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year ……
Coming on 6th Jan ‘2023 - only on @TSeriespic.twitter.com/OmKifS03ZN
दिवाळीच्यानिमित्त त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. "जय लक्ष्मी माता" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली होती. "दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं अमृता यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. अमृता यांच्या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून कौतुकाचा वर्षाव केला होता. काहींनी गाणं अतिशय सुंदर असल्याचं म्हटलं होता.
अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत याआधी 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचं गाणं प्रदर्शित झालं होतं. "जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही!" असं या गाण्यात म्हटलं होतं. तसेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त ‘ये नयन डरे डरे’ हे गाणं देखील गायलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"