शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवेंद्र फडणवीस : त्यागाचे काय होईल?

By यदू जोशी | Updated: March 30, 2024 11:07 IST

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. रा. स्व. संघाचा स्वयंसेवक, अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, भाजपचा नगरसेवक, महापौर, भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष, आमदार, मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री असा वयाच्या ५२ वर्षांपर्यंतचा विलक्षण प्रवास. २०२२ मध्ये राज्यात उद्धव ठाकरे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीला शह देत महायुती सत्तेत आली. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत चमत्कार घडवला तो देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने. त्यातून मग सुरत, गुवाहाटीचा प्रवास घडला.

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले. क्लायमॅक्स बाकी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना फोन केला, ‘मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय तुम्ही नेता म्हणून घेतला आहे पण मी आज तुमचा नेता म्हणून तुम्हाला आदेश देतोय की, तुम्ही मंत्रिमंडळात राहिलेच पाहिजे.’ फडणवीस ‘सागर’ बंगल्यातील एका खोलीत मोदींशी बोलून बाहेर आले अन् त्यांनी काहीच वेळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जुलै २०२३ मध्ये आणखी एक चमत्कार घडला. राष्ट्रवादी फुटली; अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री झाले. लोकसभेचे गणित बसविण्यासाठी दोन मित्र जोडण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करताना फडणवीस यांनी दरवेळी त्याग केला. 

अत्यंत अभ्यासू, प्रचंड आवाका असलेले फडणवीस यांच्यातील चाणाक्ष राजकीय नेत्याचे नवे दर्शन शरद पवार यांच्यासह सर्वांनाच गेल्या काही वर्षांत झाले. पण पक्षासाठी सगळे काही करताना त्यांच्या पदाचा संकोच होत गेला. त्याबाबतच्या अनेक थिअरी अनेकांनी दिल्या. मात्र, त्यासंबंधीची कोणतीही अस्वस्थता कधीही चेहऱ्यावर येऊ न देता ते काम करत राहिले. स्वत:विषयी ते अबोल आहेत. त्यांच्या मनातील खंत, व्यथा, दु:ख कधीही बाहेर येत नाही; अगदी जवळच्यांपाशीसुद्धा. ते चालत राहतात, कामे करत राहतात, अभ्यास करत राहतात आणि अविचल पक्षनिष्ठेच्या मार्गावर पुढे जात राहतात.

या हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजू द्यायची नसते म्हणतात. फडणवीस त्यांच्या पुढे आहेत. ज्या हाताने लोकांना मदत केली त्या हातालाही ते कळू देत नाहीत. छटाकभर मदतीचा बभ्रा करणारे अनेक नेते आहेत. पण फडणवीस विरळेच. श्रेयवादाच्या लढाईतही ते पडत नाहीत. स्वत:चे नेतृत्व जातीपातींच्या संदर्भांपलीकडे त्यांनी कधीच नेऊन ठेवले आहे. २०१४ पासूनचे महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांभोवती फिरत आहे. ‘यू कॅन लव्ह हिम ऑर यू कॅन हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम...’ फडणवीसांबाबत हे वाक्य चपखल बसते. पक्षात काही नेत्यांविषयी त्यांचा दुरावा निर्माण झाला; ते बहुभानी फडणवीसांना टाळता आले असते, असे बरेचदा वाटते. 

फडणवीस दोन मित्रांना सोबत घेऊन लोकसभेच्या लढाईवर निघाले आहेत. ज्या विदर्भातून येतात, त्याचा अनुशेष आजही बाकी आहे. सत्तेच्या समीकरणात फडणवीसांचा पदाचा अनुशेष वाढत चालला आहे. त्यागाचा सव्याज परतावा त्यांना मिळावा, ही भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती त्यांचे श्रेष्ठी पूर्ण करतील का? या प्रश्नाचे उत्तर काळ देईलच. तोवर फडणवीस यांच्या संयमाचा कस लागेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४