शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:16 IST

दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमधून विस्तव जात नाही, असे चित्र गेले कित्येक महिने असताना आज अचानक दोघांच्या भेटीचा योग जुळून आला. दोघांनी हितगुजही साधले. त्यातच विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा झाड (युतीचे) वाढविण्याचा विचार शांततेत करा, या शब्दात उद्धव यांना साद घातली. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नसली तरी दोन्ही प्रसंगांनी कटूतेचे गडद रंग फिके झाल्याचे जाणवले. 

विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे सकाळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. त्यांचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि बोलले देखील.

‘बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी’आठ महिन्यांपासून दोघांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. पण, आजच्या भेटीत सहजता होती; कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असे म्हटले.

परिषदेत झाड, खत, फळे आणि हास्यकल्लोळ विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत उद्धव ठाकरे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोले - प्रतिटोल्यांनी खसखस पिकविली. ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या उद्घाटनाला शरद पवार आले होते. आपणही होते. पवार साहेबांनी झाड लावले, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरेंनी ‘पण त्या झाडाला फळेच लागली  नाहीत’ असा टोला लगावला. त्यावर मुनगंटीवार म्हणाले - ‘उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो, की झाडाला फळे येतील. पण, तुम्ही झाडाशीच नाते तोडले. आता त्याला काय करणार? मी व्यक्तिगत येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणते खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरेच खत दिले. त्या झाडाला फळे कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती’. यावर ठाकरे यांनी “त्या पाकिटात खत नव्हते, निरमा होते” असा टोला लगावला. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, खतच होते. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं ते झाड  जाळणारे होते, ते टाकले. अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, ‘पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा’, असे आवाहन मुनगंटीवार यांनी करताच पुन्हा हंशा पिकला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Parishadविधान परिषद