शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांनी आश्वासन पाळले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवरील मोठे संकट टळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 23:39 IST

Sugar Factories in Maharashtra : त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे.

मुंबई - गेल्या ३५ वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सच्या चौकशीची टांगती तलवार होती. तसेच त्यामधून सुमारे ९ हजार कोटी रुपयांची वसुली होणार होती. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांसह सहकारमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित शाहांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री अमित शाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळत मागील ३५ वर्षाचे जे इन्कम टॅक्सचे संकट होतं ते पूर्णपणे दूर केले आहे. या संदर्भातील नोटिफिकेशन आज निघालं आहे, त्याबद्द्ल त्यांचे आभार मानतो. याबाबत रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, राज्यातील सहकारामधील आघाडीचे नेते आणि मी स्वत: असे आम्ही सर्वजण अमित शहा यांना भेटलो होतो. गेली ३५ वर्षे ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले अशा साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सची टांगली तलवार लटकलेली आहे. तसेच ९  हजार कोटींची वसुली शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले म्हणून कारखान्यांकडून करण्यात येणार होती, हा एकप्रकारचा अन्यास आहे, ही बाब आम्ही अमित शाहांच्या लक्षात आणून दिली होती. त्यावेळी अमित शाहा यांनी याच्यावर सरकार निर्णय़ करेल असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार तातडीने पावले उचलून हा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना अधिक पैसे देण्यासाठी साखर कारखान्यांना एक प्रकारचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. यामुळे साखर कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. या निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शाहा आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र