शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:38 PM

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठळक मुद्देफडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूरशपथपत्रात गुन्हे लपवल्याच्या आरोप प्रकरणात दिलासान्यायालयाकडून नक्की न्याय मिळेल; फडणवीसांना विश्वास

नागपूर: निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. नागपूर न्यायालयानं फडणवीस यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची माहिती दिली. १९९५ ते ९८ दरम्यान आम्ही झोपडपट्टी काढण्याच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी माझ्या विरोधात दोन खासगी तक्रारी झाल्या. त्या संपल्या असल्यानं २०१४च्या प्रतिज्ञापत्रात त्या नमूद केलेल्या नाहीत. या प्रकरणात माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र कनिष्ठ न्यायालयात, उच्च न्यायालयात खटला जिंकलो. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं. त्यांनी हा खटला पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे पाठवला. कनिष्ठ न्यायालयानं मला समन्स पाठवल्यानं आज हजर राहिलो, असं फडणवीस सांगितलं. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. ज्या कुठल्या केसेस त्या आंदोलनाच्या केसेस आहेत, हे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'माझ्या प्रतिज्ञापत्रात या दोन केसेस मेन्शन न करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. कलम १२५ प्रमाणे त्या हेतूनं केस लपवण्याचा उद्देश नव्हता. कारण ती प्रकरणं तशी नव्हतीच असं ते पुढे म्हणाले. मला न्याय मिळेल हे निश्चित आहे. कारण माझ्याविरुद्धच्या केसेस सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करण्यातून निर्माण झालेल्या आहेत. त्या वैयक्तिक स्वरुपाच्या नाहीत. यामागे कोण आहे ते याची मला कल्पना आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट त्यावर बोलणार नाही. योग्य वेळी यावर बोलेन, असं फडणवीस यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्याBreaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूरVIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्यNirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय