शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: 'ठाकरे सरकारमध्ये अजितदादा सर्वात फायद्यात!', असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:07 IST

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

मुंबई-

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्र राज्य आज गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी सादर करत फडणवीसांनी राज्याचं गृहखातं झोपा काढत असल्याचा आरोप केला. गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असलं तरी दोषसिद्ध करण्याचं प्रमाण देखील कमी असल्याचा मुद्द्यावर फडणवीसांना यावेळी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात दोषसिद्ध होण्याचं प्रमाण बिहारपेक्षाही कमी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. 

ठाकरे सरकारवर चौफेर हल्लाबोल करत असताना फडणवीसांनी आपल्या भाषणात निधी वाटपावरही भाष्य केलं. यात ठाकरे सरकारमध्ये अजित पवार सर्वात फायद्यात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं. 

नेमकं काय घडलं?फडणवीस आपलं म्हणणं मांडत असताना त्यांनी निधी वाटपावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावताना राष्ट्रवादीला कसा सर्वाधिक निधी मिळाला याची आकडेवारी मांडली. "सरकारमध्ये अजितदादा तुम्ही सर्वात फायद्यात आहात असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण जो निधी वाटप झाला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखत्यारितील खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला. हा आकडा २ लाख ५० हजार ३८८ कोटी इतका आहे. काँग्रेसवाले पण हुशार निघाले. रोज तक्रार करुन करुन त्यांनी १ लाख १ हाजर ७६६ कोटी रुपये निधी प्राप्त केला. पण शिवसेनेवाले हातवर करुन फसले. सर्वात जास्त आमदार असूनही केवळ ५४ हजार ३४३ कोटी निधी मिळाला", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अमरावती, नांदेडमध्ये दंगलीचा 'प्रयोग' अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा यावेळी फडणवीसांनी केला. एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. यात जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकांना लक्ष्य केलं गेले. हिंदुच्याच दुकानांची तोडफोड केली गेली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यादिवशी अमरावतीत संबंधित प्रकार घडला त्यादिवशीच्या घटनेबाबत कुणी बोलायला मागत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम उमटले त्यावरच सगळे बोलू लागले आणि त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार