शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"यांना लाज वाटली पाहिजे, हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेत..."; देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:01 IST

Tipu Sultan Chhatrapati Shivaji Maharaj Comparison Controversy: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना

Tipu Sultan Chhatrapati Shivaji Maharaj Comparison Controversy: मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. वाद चिघळल्यावर त्यांनी तो फोटो दालनातून काढून टाकला. या वाद शमेल अशी अपेक्षा असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांची केली. या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड भूमिका मांडली.

लाज वाटायला पाहिजे...

"काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली आहे, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे कुठल्या शाळेत इतिहास शिकले?

"काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने याची दखल घेतली पाहिजे. तसेच काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांनी याबाबतची भूमिका काय आहे, ती त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. असे विधान करणारे लोक कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं संशोधन केले पाहिजे. जो नवा इतिहास हे लोक लिहू पाहतात, तो इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही," असेही त्यांनी खडसावले

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत व्यक्त केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis Furious Over Tipu Sultan-Shivaji Maharaj Comparison; Demands Apology

Web Summary : Devendra Fadnavis condemned the comparison of Tipu Sultan to Chhatrapati Shivaji Maharaj by Congress leader Harshvardhan Sapkal. He demanded an apology, criticizing Sapkal's historical understanding and warning against appeasement politics. Fadnavis asserted that Maharashtra and India would not tolerate such comparisons.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज