शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

2019 नंतरही मीच मुख्यमंत्री; फडणवीसांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 15:37 IST

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याचे सूतोवाच

लातूर: आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यात 100 कोटींचा निधी देण्यात येईल. यातील पहिला टप्प्यातील निधी लगेच, दुसऱ्या टप्प्यातील निधी पुढील वर्षात आणि तिसरा टप्पादेखील माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण 2019 नंतरही मीच मुख्यमंत्री असणार आहे, असं फडणवीस यांनी केला. ते अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. लातूरमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचे सूतोवाच केले. राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती आहे. पंचनामे वेगाने सुरू आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची स्थिती समोर येईल. त्यानंतर केंद्रीय पथकाची पाहणी पूर्ण झाल्यावर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही दिली.यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठे काम झाले. परंतु मराठवाड्यात ७० टक्के व त्यापेक्षा कमी पाऊस झाला. या कठीण परिस्थितीत सरकार जनतेच्या पाठीशी आहे. गत सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना ७ हजार कोटींची मदत मिळाली. मात्र आम्ही चार वर्षांत २२ हजार कोटींची मदत दिली. १५ वर्षांत ४५० कोटींचा शेतमाल खरेदी केला होता. या सरकारने चार वर्षांत ८ हजार ५०० कोटींचा शेतमाल खरेदी केला आहे. चार लाख घरकुले पूर्ण झाली. सहा लाख पूर्ण होतील. सन २०२२ पर्यंत १२ लाख बेघरांना घर दिले जाईल. त्यात सन २०१९ पर्यंत १० हजार लोकांना घरे मिळतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेचीही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना असून त्याअंतर्गत ५० कोटी लोकांना मोफत उपचार मिळणार आहेत. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य साहाय्य योजना या माध्यमातून ९० टक्के लोकांना आरोग्य सेवेचे कवच मिळाले आहे. सरकार तर आहेच, पण दानशूरही मदत करत आहेत. आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये ग्रामीण भागातही दर्जेदार खाजगी आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, केवळ भौतिक विकास पुरेसा नाही़ सामाजिक संतुलनासाठी आरोग्यदायी जीवन आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजनांमुळे कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लातूरला भरभरून दिले आहें त्यांचे नागपूरपेक्षा लातूरवर अधिक प्रेम आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाdroughtदुष्काळ