देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:46 IST2025-04-30T15:45:26+5:302025-04-30T15:46:50+5:30
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर वर्षा बंगल्यात राहायला गेले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
Devendra Fadnavis: आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सीआयएससीई (CISCE) बोर्डाने 10 वीचा निकाल जाहीर केला. यात मुख्यमंत्र्यांची मुलगी दिविजा हिने 92% गुण मिळवले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये अमृता यांनी आणखी एक गुडन्यूज सांगितली आहे.
सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 30, 2025
आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला.
आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६०… pic.twitter.com/l03aLKE2Ak
अमृता फडणवीस यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच दोन गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केल्या. आपल्या पोस्टमध्ये अमृता लिहितात, 'सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरुन गेलंय. आमची सुकन्या दिविजा ही 10वीच्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.'
वर्षावर कधी जाणार? विरोधकांकडून विचारणा
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारण्यात येत होता. तसेच, याबाबत गेल्या काही काळापासून उलट सुलट चर्चाही सुरू होत्या. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत फडणवीसांनी आपल्या मुलीच्या दहावीचे कारण पुढे केले होते. ‘माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे,' असे फडणवीस म्हणाले होते. आता अखेर अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर देवेंद्र फडणवीस सहकुटुंब वर्षावर राहाया गेले आहेत.