शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 01:49 IST

"अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण..."

मोदी आडनावासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर, लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकीही रद्द केली. यानंतर, घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत, “माफी मागायला मी सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कुणाचीही माफी मागत नाहीत,” असे म्हटले होते. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता भाजप-शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) स्वातंत्रवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ "सावरकर गौरव यात्रा" काढली आहे. या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवरही खरमरीत टीका केली.

फडणवीस म्हणाले, "जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, ते सावरकरांना माफीवीर म्हणतात. अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण त्यांची तेवडीही पात्रता नाही, जे स्वातंत्रवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचे नाव सांगता, त्या पक्षाच्यान नेत्यांनी इंदिरा गांधींचा गौरव केला, यशवंत राव चव्हानांनी त्यांचा गौरव केला आणि तुम्ही कुठले काल आलेले स्वातंत्रवीर सावरकरांना माफीवीर म्हणता."

यावेळी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवताना फडणवीस म्हणाले, "दुर्दैव एका गोष्टीचं आहे की, ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसलेले आहेत. खरे तर, ही एवढी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. पण हे (उद्धव ठाकरे) त्यांचा निषेध करू शकले नाहीत. एवढेच नाही, तर आताही जेव्हा सावरकरांचा अपमान होतो, तेव्हा  हे म्हणतात, आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार नाही. अरे हे चालवतच आहात.” असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा