मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:17 IST2025-10-24T15:03:46+5:302025-10-24T15:17:17+5:30
या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil:मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपाठीवार येतील. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भव्य सोहळ्याचं आयोजन भाजप आमदार समाधान अवताडे (पंढरपूर-मंगळवेढा) यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण दिले असून, तेदेखील उपस्थित राहणार आहेत.” मात्र, जरांगे पाटलांनी कार्यक्रमास येणास होकार दिला का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यांत जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्यात तीव्र आंदोलन झाले. त्यांनी अनेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही वक्तव्ये केली. या सर्व घडामोडीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर हा सोहळा महत्वाचा मानला जातोय. आता या कार्यक्रमाला जरांगे पाटील येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जरांगे पाटील या कार्यक्रमाला आले, तर ही मोठी घडामोड असेल.