शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:03 IST

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी (दि.१२) भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले.

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडूनही कंबर कसली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी (दि.१२) भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. याशिवाय, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा. अधिकाधिक वेळ आपापल्या मतदारसंघात द्या. मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना देत लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिले.

 दरम्यान, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आढावा घेण्यासाठी स्वतःचे सर्व्हे सुरू केले आहेत. भाजपकडून राज्यभरात असे अंतर्गत सर्व्हे सुरू आहेत. अशातच भाजपने विदर्भात केलेल्या अंतर्गत सर्व्हेची माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त २५ जागा मिळत असल्याची असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा सर्व्हे महायुतीची चिंता वाढवणारा आहे.

विदर्भात भाजपला १८, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला २ जागा  भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महाविकास आघाडीला २५ जागा मिळत असल्याचे समोरआले आहे.त्यात भाजपला १८ जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातील ६२ पैकी ३९ आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यात १२ पैकी भाजपाला फक्त ४ जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र