मुंबई परिसरात विकासाचे उड्डाण!

By Admin | Published: June 28, 2014 02:01 AM2014-06-28T02:01:41+5:302014-06-28T02:01:41+5:30

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

Development of Mumbai airport! | मुंबई परिसरात विकासाचे उड्डाण!

मुंबई परिसरात विकासाचे उड्डाण!

googlenewsNext
>मुंबई - मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 634 कोटींची तरतूद करताना कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मेट्रो मार्गासाठी 5क्क् कोटी तर मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-2साठी एक हजार कोटींची तरतूद करणारा एमएमआरडीएचा अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. आज मंजूर केलेल्या 2क्14-15च्या अर्थसंकल्पात 3,624 कोटींच्या विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला प्राधिकरणाने मंजुरी दिली. यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. 
यामध्ये चार उड्डाणपूल, रेवसपासून कारंजार्पयत जाणारा रेवस खाडी पूल आणि माणकोली-मोटेगाव आणि उल्हास खाडीजवळील कल्याण-भिवंडी रस्ता येथील दोन पुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणो प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग-4वरील टक्का कॉलनी ते पळस्पे फाटा, खोपोली शहर वळण रस्ता, भिवंडी वळण रस्ता, कल्याण वळण रस्ता आणि शिरगाव फाटा आणि बदलापूरला जोडणा:या जोडरस्त्याचाही यात समावेश आहे.  मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई शहरामध्ये उड्डाणपूल आणि रस्ते विकासासाठी 215 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सन 2क्14-15मध्ये मुंबई रेल विकास महामंडळातर्फे नवीन रेल्वे गाडय़ा खरेदी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी या वेळी सांगितले. 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2क्14-15साठीच्या 4 हजार 24क् कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महामुंबईतील मेट्रो, मोनो, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी यात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. प्रगतिपथावरील व प्रस्तावित प्रकल्प प्राधिकरणाने नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे या वेळी चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 134वी बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस मुंबईचे महापौर सुनील प्रभू, आमदार नवाब मलिक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रकाश बिनसाळे, मुख्य सचिव जे.एस. सहारिया, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे तसेच प्राधिकरण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 
नवीन कामे हाती घेताना त्यासाठी लागणारे जमीन संपादन वेळेत पूर्ण करा. तसेच यासाठी येणा:या खर्चाची तरतूद प्रकल्पाच्या किमतीमध्ये समाविष्ट करावी. नवीन कामे हाती घेताना त्याचा मास्टर प्लॅन तयार करावा. विकासकामे करताना त्याचा सामूहिक विकास होईल, यादृष्टीने नियोजन करावे. - पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
 
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-2साठी अर्थसंकल्पात 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2क्14-15मध्ये मुंबई रेल विकास महामंडळातर्फे 
नवीन रेल्वे गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. - संजय सेठी, संचालक, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 
 

Web Title: Development of Mumbai airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.