शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम, १२ एप्रिल राेजी भरणार उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:04 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढल्यानंतरही रविवारी शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेत बारामतीतून लोकसभा लढविण्याचा निर्णय माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढल्यानंतरही रविवारी शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. १२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. बारामतीत अजित पवाररूपी हुकूमशाही  संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे, असे त्यांनी जाहीर केल्याने महायुतीमधील वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोकसभेसाठी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच शिवतारे यांनी भूमिका जाहीर केल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवतारे म्हणाले, अजित पवारांविरोधात आपली लढाई आहे.  राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात असून मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मला केवळ अजित पवार यांचा पराभव करायचा आहे.

‘शरद पवारांनी ग्रामीण दहशतवाद पसरवला’ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहीती पडेल. ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस असून दोघांचा खात्मा करायचा आहे, असे शिवतारे म्हणाले.

युती धर्म पाळावाच लागेल : संजय शिरसाटपक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल. ज्यांना हा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावेत. त्यांना आमचा पाठिंबा नसणार आहे. कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही.पण जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. पण जर एखाद्याने पक्ष सोडला असेल तर तो स्वतंत्र आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४