विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:09 IST2025-05-20T17:08:50+5:302025-05-20T17:09:54+5:30
Jayant Narlikar News: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ,संशोधक आणि भारतीय वैज्ञानिक समुदायातील अढळ स्थान मिळवलेले डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ,संशोधक आणि भारतीय वैज्ञानिक समुदायातील अढळ स्थान मिळवलेले डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
"डॉ. नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, " असे नमूद करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, "त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर विज्ञानाचे सामान्य जनतेशी नाते निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या लेखनातून आणि विचारांतून अनेक तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला."
डॉ. नारळीकर हे केवळ एक नामवंत वैज्ञानिकच नव्हते, तर ते प्रभावी लेखक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते, असे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून ते सदैव लक्षात राहील, असेही त्या म्हणाल्या.
"डॉ. नारळीकर यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करते. तसेच या अतीव दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांचा परिवाराला परमेश्वराने द्यावी," अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.