“प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:54 IST2026-03-07T14:53:56+5:302026-03-07T14:54:49+5:30

Deputy CM Eknath Shinde News: आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना आहे, जे बोलतो ते करून दाखवणारी शिवसेना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

deputy cm eknath shinde taunt uddhav thackeray group that love of people is more important than how much property earned | “प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेसेनेला टोला

“प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेसेनेला टोला

Deputy CM Eknath Shinde News:शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, म्हणूनच दररोज शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसे किती कमावली आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असा टोला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला लगावला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. निवडणुकीवेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केले. जे बोलतो ते करून दाखवणारी शिवसेना आहे. अडीच वर्षात केलेल्या कामामुळे इतिहासात पहिल्यांदा महायुतीचे २३२ आमदार निवडून आले.

आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना या उद्देशाने पक्षाचे काम 

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांवर हा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळेच सोलापूरमधील एका गरीब घरातील लाडक्या बहिणीला पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही आणि नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना या उद्देशाने पक्ष काम करतो. पहलगाम हल्ल्यावेळी महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित आणले. आताही इराण आणि अमेरिका युद्धामुळे दुबई अडकलेल्या शेकडो भारतीयांना दोन विशेष विमानाने मायदेशी आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धवसेनेचे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उन्मेष पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

 

Web Title : एकनाथ शिंदे का ठाकरे पर तंज, संपत्ति से ज्यादा लोगों का प्यार महत्वपूर्ण।

Web Summary : एकनाथ शिंदे ने ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि संपत्ति से ज्यादा लोगों का समर्थन महत्वपूर्ण है। उन्होंने किसान ऋण माफी और 'लाड़की बहिन' जैसी योजनाओं का उल्लेख किया। पूर्व सांसद उन्मेष पाटिल समर्थकों के साथ शिंदे की शिवसेना में शामिल हुए, जिससे पार्टी का विस्तार हुआ।

Web Title : Eknath Shinde slams Thackeray, emphasizes people's love over property.

Web Summary : Eknath Shinde emphasized public support over wealth, highlighting Shiv Sena's commitment to the common man. He mentioned farmer loan waivers and initiatives like the 'Ladki Bahin' scheme. Former MP Unmesh Patil joined Shinde's Shiv Sena with supporters, reinforcing the party's expansion.