उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर पोहोचले; श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:33 IST2026-02-03T10:29:37+5:302026-02-03T10:33:26+5:30

Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन आणि पूजा केली.

deputy cm eknath shinde reached malanggad had darshan of shri machhindranath | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर पोहोचले; श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले, म्हणाले...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर पोहोचले; श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले, म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde: श्री मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती, आस्था आणि उत्सवाच्या संगमाने उजळून निघाला आहे. या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यापुढेही याच उत्साहात सुरू राहील असे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथाच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होत आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेत भक्त भावविवश होत असून, परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचे काम आजही भक्त आणि सेवाभावी संस्था करत असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले. मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असून, लवकरच यावर न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. 

 

Web Title : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगड़ पहुंचे, प्रार्थना की और लंबित मुद्दों पर बात की

Web Summary : एकनाथ शिंदे मलंगगड़ पहुंचे और निर्माण संबंधी अनुकूल अदालती फैसले का विश्वास जताया। उन्होंने बालासाहेब ठाकरे और आनंद दिघे से प्रेरित चल रही तीर्थयात्रा पर प्रकाश डाला, जिसे अब आसान पहुंच के लिए रोपवे से बढ़ाया गया है। शिंदे ने परंपरा को बनाए रखने और सुरक्षित तीर्थयात्रा सुनिश्चित करने में समुदाय के प्रयासों को स्वीकार किया।

Web Title : Deputy CM Eknath Shinde Visits MalangGad, Prays and Addresses Pending Issues

Web Summary : Eknath Shinde visited MalangGad, expressing confidence in a favorable court decision regarding construction. He highlighted the ongoing pilgrimage inspired by Balasaheb Thackeray and Anand Dighe, now enhanced with a ropeway for easier access. Shinde acknowledged the community's efforts in maintaining the tradition and ensuring a safe pilgrimage.