शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 09:31 IST

‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

मुंबई : ‘अजित पवारांनी सांगितले तरी मी निधी देणार नाही’ असे राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी म्हटल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी मंगळवाारी विधानसभेत केला. अशा अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपचे आशिष शेलार यांनी केली. त्यावर, ‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीआगर (ता. गुहागर) येथील मच्छीमारांसाठी मूलभूत सुविधा व जेटी उभारण्याबाबत भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या कामासाठी ८ कोटी ४६ लाख रुपये खर्च येणार असून तो जिल्हा नियोजन समितीतून केला जाईल, या मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या उत्तरावर समाधान न झालेले भास्कर जाधव यांनी डीपीसीतून निधी देणार हे मंत्री कोणत्या अधिकारात सांगत आहेत, असा सवाल करून खात्यामार्फत निधी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा मंत्री शेख यांच्यावर जोरदार भडिमार सुरू असताना उपमुख्यमंत्री पवार सभागृहात आले.  मी माझ्या दालनात अस्लम शेख, अनिल परब, भास्कर जाधव आणि संबंधितांची बैठक घेतो. आयुक्त ऐकत नसतील तर त्यांना शांतपणे सांगतो अन् तरीही ऐकले नाही तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो. कुठून मिळाला नाही तरी सरकार या कामांसाठी नक्कीच निधी देईल, असे पवार यांनी सांगितल्यानंतर सभागृहाचे समाधान झाले.दोन महिन्यांवरून आले सात दिवसांवर‘अजित पवारांनी सांगितले तरी मी निधी देणार नाही’ या मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या विधानाची चौकशी दोन महिन्यात केली जाईल, असे आश्वासन मंत्री अस्लम शेख यांनी दिले. पण दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी दोन महिने कशाला? असा धोशा लावला. त्यावर शेख यांनी १५ दिवसांत चौकशीचे आश्वासन दिले. तरीही सदस्यांचे समाधान न झाल्याने अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांच्या आत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBhaskar Jadhavभास्कर जाधवAshish Shelarआशीष शेलार