अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जबाबदारी आली आहे. सुनेत्रा पवार यांनी कामाला सुरूवात केली असून, त्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये राज्यातील राजकारणावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण विलिनीकरणाचा मुद्दा जास्त चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाचे दावे केले गेले. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी अजित पवारांची इच्छा होती असेही या नेत्यांकडून सांगितले गेले. हा मुद्दा सध्या शांत झाला असला, तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडेही लक्ष आहे. या भेटीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याचे कळते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही त्या देणार आहेत. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून कोणाला पाठवणार याबद्दलही चर्चा सुरूच आहे.
विलिनीकरणाबद्दल भाजपाशी भूमिका काय?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्याची माहिती भाजपाला द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशीच भूमिका मांडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करावी लागेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Web Summary : Deputy CM Sunetra Pawar, along with party leaders, met Amit Shah in Delhi to discuss Maharashtra politics. Speculation surrounds a potential party merger, requiring BJP's awareness. Pawar's future decisions are keenly observed.
Web Summary : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने पार्टी नेताओं के साथ दिल्ली में अमित शाह से मुलाकात कर महाराष्ट्र की राजनीति पर चर्चा की। भाजपा की जानकारी की आवश्यकता के साथ, संभावित पार्टी विलय को लेकर अटकलें लगाई जा रही हैं। पवार के भविष्य के फैसलों पर पैनी नजर रखी जा रही है।