शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आधी मागणी, नंतर नकार; १०८ कोटींची औषधे पडून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:06 IST

औषध खरेदीचा बट्ट्याबोळ; मंत्र्यांच्या बैठकीला सचिवांची दांडी

- अतुल कुलकर्णी मुंबई : आधी जास्तीच्या औषधांची मागणी हाफकिनकडे दिली. त्यांनी खरेदी केल्यानंतर आता आम्हाला एवढी औषधे नको असे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितल्याने खरेदी होऊनही तब्बल १०८ कोटी रुपयांच्या औषधांचा पुरवठाच झालेला नाही. तर जे.जे. रुग्णालयाने श्वानदंशाच्या औषधांची मागणी हाफकिनकडे दिली, त्यानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आम्हाला हे औषध नको, अशी भूमिका घेतली. या दोनच उदाहरणांवरून औषध खरेदीचा बट्ट्याबोळ लक्षात येऊ शकतो.राज्य सरकारने गाजावाजा करून औषध खरेदी हाफकिन महामंडळाकडे दिली पण वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे १७ मेडिकल कॉलेज व सार्वजनिक आरोग्य विभागाचा गोंधळ आणखी वाढविण्याची मानसिकता, यामुळे खरेदीच्या नियोजनात काहीही फरक पडलेला नाही, त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीला सार्वजनिक आरोग्य सचिव प्रदीप व्यास हजर राहिले नाहीत, त्यावरही बापट यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सकाळी मंत्रालयात दिसलेले व्यास याच बैठकीला का आले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. ते येऊ शकले नाहीत म्हणून आम्हाला पाठविल्याची सारवासारव इतरांनी केल्याचे मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी १७ मेडिकल कॉलेज एकाच मशीनसाठी वेगवेगळ्या प्रकारची स्पेसिफिकेशन व वेगवेगळ्या किमतीला घेण्याचे प्रस्ताव थेट हाफकिनला पाठवतात, तीच अवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. त्यामुळे हे विभाग रुग्णांसाठी काम करतात की, औषध पुरवठादार कंपन्यांसाठी, असा सवालही बापट यांनी केला. कमी रकमेची प्रशासकीय मान्यता द्यायची. निविदेत जास्तीचा दर आला की परत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी फाइल फिरवत राहायची आणि नंतर निधीअभावी औषध खरेदी रखडली, अशी ओरड करायची. त्यासाठी निविदाही प्रलंबित ठेवायच्या असे प्रकार आणखी किती दिवस चालणार, असा सवालही बापट यांनी केला.जबाबदारी विभागांच्या संचालकांचीऔषध खरेदी करण्यापूर्वी विभागाकडून मागणी मागवावी. दोन्ही विभागांच्या संचालकांनी ती तपासावी. त्याची गरज, दर, स्पेसिफिकेशन तपासावेत आणि अंतिम यादी हाफकिनकडे पाठवावी. यापुढे कोणत्याही मेडिकल कॉलेजने किंवा आरोग्य विभागाच्या कोणत्याही अधिकाºयांनी थेट हाफकिनकडे मागणी पाठवू नये. हाफकिनकडे आलेल्या यादीची सगळी जबाबदारी यापुढे दोन्ही विभागांच्या संचालकांची असेल, असे आदेश मंत्री गिरीश बापट यांनी दिले.

टॅग्स :medicineऔषधंMedicalवैद्यकीयgirish bapatगिरीष बापटHealthआरोग्य