शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: April 2, 2015 04:55 IST

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते

मुंबई : मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुंबईतील चांगले आर्किटेक्ट बोलावून नवा आराखडा तयार करा, असे ते म्हणाले. तर भाजपाचे आशीष शेलार आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी प्रस्तावित आराखडा मराठीत प्रसिद्ध करून त्यानंतर दोन महिन्याच्या आत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवा, अशी जोरदार मागणी केली. बाहेर टीकेचा विषय झालेला हा आराखडा विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या रोषाचा विषय ठरला. मुंबईच्या विकासासंदर्भात नियम २९३ नुसार सभागृहात चर्चा झाली. त्यावेळी भुजबळ यांनी एकामागून एक एफएसआय वाढवून देण्याने श्रीमंताचे भले होईल पण मुंबई मृत्यूपंथाला लागेल, असा इशारा दिला. शेलार म्हणाले की, हा आराखडा तयार करण्याचे काम एससीई या फ्रेंच कंपनीला देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष हे काम ईजीस जिओ प्लॅन या कंपनीने केले. विकास आराखड्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे. या आराखड्यात मुंबईचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण असावे अशी कार्यकक्षा महापालिकेच्या स्थायी समितीने ठरवून दिली होती. पण तसे कुठेही दिसत नाही असे ते म्हणाले.यावेळी जयंत पाटील, मंगलप्रभात लोढा, सदा सरवणकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, वारिस पठाण, भारती लव्हेकर, सुनील शिंदे, धैर्यशील पाटील, रमेश लटके, अमित साटम, पराग अळवणी, अबू आझमी यांनी या चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)