शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ओबीसींच्या आरक्षणातील अतिक्रमणाचा डाव हाणून पाडा - श्रावण देवरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 05:22 IST

OBC reservation : कोल्हापुरात शनिवारी श्रमिक ओबीसी महासंघातर्फे शाहू स्मारकमध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली.

कोल्हापूर : राज्यघटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रिय, जमीनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरू आहे, तो खऱ्या ओबीसींनी संघटितपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीसी महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे, तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरून २५ टक्क्यांपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापुरात शनिवारी श्रमिक ओबीसी महासंघातर्फे शाहू स्मारकमध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसह सहकारी संस्थांतील प्रतिनिधित्व व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीचे १८ ठराव एकमताने मंजूर झाले.परिषदेचे अध्यक्ष श्रावण देवरे म्हणाले, ओबीसी समाज कायम दुर्बलच राहावा, असे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत आहेत. मराठा, जाट हा बलवान समाज आहे, ते ओबीसीमध्ये आले, तर खरे ओबीसी आपोआपच मागे पडणार आहेत. देशातील ५२ टक्के असणाऱ्या या बहुजन समाजाच्या दृष्टीने हे घातक असल्यानेच आता ओबीसी समाजाने हक्कासाठी अधिक जागरूक राहिले पाहिजे. एसईबीसी म्हणजेच ओबीसी आहे, फक्त शब्दछल करून ओबीसींना फसवले जात आहे.स्वागताध्यक्ष डॉ. आनंद गुरव म्हणाले, आरक्षणामुळे का असेना गावात ओबीसी पद, मान मिळत आहे; पण उच्च समाजातील लोक अजूनही पद देऊन उपकार केल्याची भाषा वापरत असल्याचे चित्र दिसते. ओबीसींनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने लोकशाहीने दिलेल्या हक्काचा वापर करावा.

परिषदेतील प्रमुख ठराव- ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी- ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे- मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण ओबीसीतून नको

- धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, विणकरांना ओबीसीत घ्या- सहकारी नोकरी व संस्थांमध्ये ओबीसी प्रतिनिधी घ्या- बढतीतील आरक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करा- बँकांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा करण्यास सांगा

टॅग्स :reservationआरक्षणkolhapurकोल्हापूर