शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

दीपालीला जाऊन वर्ष पूर्ण, महिला कर्मचारी दहशतीतच; असुरक्षित, भीतीचे वातावरण अजून कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:01 IST

वर्षभरात प्रकरण पोलीस ते न्यायालय, समित्या अशा चक्रातून गेले. मात्र मेळघाटात कार्यरत इतर ‘दीपालीं’च्या समस्या ‘जैसे थे’च आहे. 

- नरेंद्र जावरे परतवाडा (जि. अमरावती) : २५ मार्च २०२१ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात प्रकरण पोलीस ते न्यायालय, समित्या अशा चक्रातून गेले. मात्र मेळघाटात कार्यरत इतर ‘दीपालीं’च्या समस्या ‘जैसे थे’च आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासात स्वत:वर गोळी झाडून जीवनाचा शेवट केला. देशभर गाजलेल्या या प्रकरणात आजही न्यायालय आणि मंत्रालयात बयान, तारीख सुरू आहे.  सुसाइड नोटमध्ये लिहिल्यानुसार, तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक झाली. नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई व गुन्हे रद्दबातल ठरविले. त्यामुळे रेड्डींना दिलासा मिळाला. इतर दीपालींचे काय?व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागात कार्यरत इतर दीपालींच्या समस्या कायम आहेत. वेतन कपातीची धमकी, सुट्या न देणे, जबरदस्तीने अतिसंरक्षित जंगलातील कॅम्पवर पाठविणे, परतवाड्यात निवासस्थानासाठी पंधरा हजारांपर्यंत लाच, आठ महिने होऊनही वेतन न देणे, कनिष्ठ न्यायालयात न्याय मिळाल्याने वरिष्ठांकडून उच्च न्यायालयात खेचण्याच्या धमक्या देणे, यामुळे वरिष्ठांच्या लेखी तक्रारी करायला आजही महिला कर्मचारी घाबरत आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर जागतिक महिला दिनी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन दिले. मेळघाटात कुठलाही स्वागतार्ह बदल झाला नाही. याची दखल न घेतल्यास वरिष्ठ स्तरावर न्याय मागू. - इंद्रजित बारस्कर, प्रदेश महासचिव, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण