शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक!  राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 18:15 IST

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे.

मुंबई - दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. 1 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमिटींचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष,पदाधिकारी आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील नुकत्‍याच निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्‍यांच्या सत्‍कार समारोहात ते बोलताना त्यांनी ही टीका केली.  कार्यक्रमाला संबोधित करताना विखे पाटील यांनी राज्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कर्जमाफीसंदर्भात सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आणताना ते म्हणाले की, "दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे.राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकारशेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतीक आहे." सरकारकडून केवळ घोषणाबाजीच सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे."या सरकारचे केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेण्‍याचे काम सुरु आहे. गोबेल्‍स नीतीप्रमाणे केवळ मीडियात फोटो छापून स्‍वत:चीच पाठ थोपटून घेण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्‍य नागरिक आणि शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणाऱ्या या सरकारच्‍या विरोधात जनतेचा असंतोषतीव्र झाला असून, नांदेडचा महानगर पालिका निवडणुकीचा निकाल या सरकारला जनतेने हाणलेली सणसणीत चपराक आहे. राज्‍याला अंधारात लोटणाऱ्या सरकारला आता नागरिकांना दिवाळीच्‍या शुभेच्‍छा देण्‍याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही." नांदेड महानगर पालिकेत काँग्रेसपक्षाला मिळालेले अ‍भूतपूर्व यश हे सरकारच्‍या विरोधातील असंतोषाचा उद्रेक असून, मतदारांनी सरकारला एकप्रकारे धडा शिकवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावरूनभारतीय जनता पक्षाने चुकीची आकडेवारी मांडली. पण या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षानेच सर्वाधिक जागा जिंकल्‍या, ही वस्तुस्थिती असल्याचे विरोधीपक्षनेत्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निकालांची वस्‍तुस्थिती जाणून न घेतापंतप्रधानांनी राज्यातील भाजप नेत्यांचेअभिनंदन केले, ही बाब दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार