सोशल मीडियासाठी बाह्य यंत्रणेचा निर्णय रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:04 AM2021-05-14T04:04:06+5:302021-05-14T06:54:19+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाजमाध्यम यंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. 

Decision of external mechanism for social media canceled, instructions of Deputy Chief Minister Ajit Pawar | सोशल मीडियासाठी बाह्य यंत्रणेचा निर्णय रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सोशल मीडियासाठी बाह्य यंत्रणेचा निर्णय रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next

 
मुंबई : उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. सद्य:स्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

स्वतंत्र यंत्रणा नको
-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाजमाध्यम यंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. 
-  त्यानंतर पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल 
मीडिया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.
 

Web Title: Decision of external mechanism for social media canceled, instructions of Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.