शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 15, 2017 17:02 IST

औसा तालुक्यातील किल्लारी येथे बुधवारी पहाटे दिगंबर माधवराव टाचले (वय 46) शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत

किल्लारी (जि. लातूर), दि.15 - औसा तालुक्यातील किल्लारी येथे बुधवारी पहाटे डिंगबर माधवराव टाचले (वय 46)  शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. किल्लारी येथील राहत्या घरी सर्वजण जागे असतानाच स्वतःच्या खोलीत जाऊन रोगर नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर पत्नी ,आईला वेगळा वास येत असल्याने दार उघडले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे दाखल करण्यात आले.
तेथे डॉ. लांडे यांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना शासकिय रुग्णालय लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले. मात्र, तेथे नेल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  दिगंबर टाचले यांच्या नावावर तीन एकर जमीन आहे व वडील माधवराव  यांच्या नावावर 3.20  साडेतीन एक्कर कोरडवाहू शेती आहे.
टाचले यांच्या नावावर सोसायटीचे अकरा हजाराचे कर्ज आहे तर मुलीच्या लग्नासाठी वडील माधवराव टाचले यांच्या नावावर शुभमंगल या योजनेचे सत्तर हाजार कर्ज घेतल्याचे समजते. मुलीचे लग्न केले असून मुलगा अविवाहित आहे. याबाबत तलाठी व्यंकट पवार यांनी तहसीलदार औसा यांना शेतकरी आत्महत्या असल्याचा अहवाल सादर केला आहे,  अशी माहीती तलाठी व्यंकट पवार यांनी दिली .दिगंबर टाचले यांच्या पश्चात आई,वडील भाऊ,बहीण,पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.