शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

साईदर्शन इमारत दुर्घटना ; मृतांची संख्या 17

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 7:43 AM

घाटकोपर येथील साई दर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला असून आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देघाटकोपर येथील साई दर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला३६ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला बांधकाम स्थैर्यता प्रमाणपत्र नव्हते. इमारत बेकायदेशीर नव्हती. मात्र नर्सिंग होमने नूतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती.

मुंबई, दि. 26 - घाटकोपर येथील साई दर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला असून आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जण जखमी झाले आहेत.  घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साई दर्शन ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तसेच दुर्घटनेची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तळमजल्यावर शिवसेना कार्यकर्त्याच्या ‘शीतप नर्सिंग होम’मध्ये नूतनीकरणात पिलर काढून टाकण्यात आला होता, इतर काम सुरू होते. अंतर्गत बदलामुळे ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे.

११ जखमींपैकी वर्षा सकपाळ, गीता रामचंदानी यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात तर रिती खनचंदानी, प्रज्ञा बेन, गणेश तकडे यांच्यावर घाटकोपर येथील शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष नामदेव चव्हाण आणि विठ्ठल श्रीगिरी यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर प्रीतेश शहा, पारस अजमेरा, आॅल्डीकोस्ट डिमेलो आणि धर्मिष्ठ शहा यांच्यावर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. ‘साईदर्शन’ या इमारतीचे बांधकाम तळमजला अधिक चार करून सोडून देण्यात आले आहे. तर प्रीतेश शहा, पारस अजमेरा, आॅल्डीकोस्ट डिमेलो आणि धर्मिष्ठ शहा यांच्यावर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

‘साईदर्शन’ या इमारतीचे बांधकाम तळमजला अधिक चार मजले असे होते. प्रत्येक मजल्यावर तीन घर याप्रमाणे संपूर्ण इमारतीत पंधरा घरे होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलातर्फे चौदा फायर इंजिन, दोन रेस्क्यू व्हॅनसह आवश्यक कर्मचारी-अधिकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाला. दुर्घटना घडली तेव्हा सुरुवातीला अंदाजे ३० ते ३५ जण ढिगाºयाखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत वरिष्ठ अधिकारी व एन विभागातील कामगार, अभियंते, जेसीबी, डम्पर्स मदतीकरिता पाठविण्यात आले; शिवाय अधिक मदतीकरिता एम/पूर्व आणि एस, टी विभागांतूनही कामगार, जेसीबी, डम्पर्स घटनास्थळी पाठविण्यात आले. एकूण चार जेसीबी, सहा डम्पर्स, एक पोकलेन व तीनशे कामगार घटनास्थळी कार्यरत होते, तसेच नऊ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. नंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे ५० अधिकारी आणि जवान घटनास्थळी मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

मुखमहानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी उपायुक्त चंद्रशेखर चोरे व अभियांत्रिकी विभागातील प्रभारी संचालक विनोद चिठोरे यांची चौकशी समिती नेमली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट नाहीच३६ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला बांधकाम स्थैर्यता प्रमाणपत्र नव्हते. नियमानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे बंधनकारक आहे. मात्र या इमारतीचे ऑडिट करण्यात आले नव्हते व तशी नोटीसही पालिकेने दिली नव्हती, असे स्थानिकांनी सांगितले.

चौकशीचा देखावा होतोयअशा इमारती पडल्या, की चौकशी समित्या नेमण्यात येतात. त्यामधून काहीही कारवाई होत नाही. बड्या अधिका-यांना क्लीनचीट देण्यात येते. यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी बड्या अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात सहाय्यक आयुक्त दोषी असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी -यशवंत जाधव, सभागृह नेते

दोषींवर कारवाई करणार :

ही इमारत बेकायदेशीर नव्हती. मात्र नर्सिंग होमने नूतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती. हे नर्सिंग होम शिवसेनेचे सुनील शीतप यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल -प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री

शिवसेना अडचणीत, सारवासारव सुरूशिवसेनेचे कार्यकर्ते सुनील शीतप यांचे या इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होम आहे. नूतनीकरणाच्या कामाचा त्रास होत असल्याची तक्रार रहिवाशांनी वारंवार करूनही ठेकेदाराने काम सुरूच ठेवले. त्यामुळे हे प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने आपला बचाव सुरू केला आहे.

या प्रकरणी कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणताही अधिकारी दोषी असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. मृतांची नावे : व्ही. रेणुका ललित ठक (३ महिने) या बालिकेसह रंजनाबेन भूपतीभाई शहा (६२), सुलक्षणा खनचंदानी (८०), मनसुखभाई गज्जर (८५), अमृता ठक (४०), दिव्या अजमेरा (४५), पंढरीनाथ डोंगरे (७५), मनोरमा डोंगरे (७०), क्रिश डोंगरे (१३ महिने), रितवी प्रीतेश शहा (१४), किशोर खनचंदानी (५०) व मिखुल खनचंदानी (३०).

साईदर्शन इमारतीच्या तळमजल्यावरील प्रसूतिगृहात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाला पालिकेच्या विभाग कार्यालयाची कोणतीही परवानगी नव्हती, असे समोर आले आहे. या बेकायदा नूतनीकरणात इमारतीचा पिलरच तोडण्यात आला, असेही समजते. घाटकोपर पश्चिम येथील दामोदर पार्क परिसरातील साईदर्शन ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. तळमजल्यावरील नर्सिंग होममध्ये नूतनीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू होते. या कामासाठी मात्र पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली. 

सुनील शीतप पोलिसांच्या ताब्यातनर्सिंग होमचा मालक सुनील शीतपसह अन्य साथीदारांवर पार्क साईट पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतपला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली.