शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 4:06 PM

Girish Mahajan reaction on Eknath Khadse death threat : एकनाथ खडसे यांना मिळेलेल्या धमकीनंतर भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया देत त्यांना चिमटा काढला आहे.

जळगाव : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, भाजपाच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना मिळेलेल्या धमकीनंतर भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया देत त्यांना चिमटा काढला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, "याबाबतीत मला काही जास्त सांगता येणार नाही. मागील काळामध्ये त्यांना (एकनाथ खडसे) दाऊदकडून धमक्या आल्या असल्याचे ते सांगतात. मात्र, मला माहित नाही. त्यामुळे  याबद्दल तेच सांगू शकतील. एकनाथ खडसे मोठे नेते असल्यामुळे त्यांना मोठ्या धकम्या येतात. पोलीस यंत्रणेकडे तक्रार केली असेल तर चौकशी करतील."

याचबरोबर, "मी राज्याचा गृहमंत्री नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल की नाही, याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. त्यांना फोन कोठून आले? कुणी केले? हा सर्व चौकशीचा भाग आहे. परंतू दाऊदचे आणि त्याच्या गँगच्या सदस्यांचे यांच्याशी काही संबंध असल्याचे कुठे दिसत नाही. तसेच, खडसे भाजपामध्ये आले म्हणून दाऊद त्यांना काही धमक्या देईल, अशी काही परिस्थिती नाही. कारण, अनेक लोक हे भाजपामध्ये आलेले आहेत. त्यांना काही अजून धकम्या आल्या नाही", असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही. 

धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया"दोन दिवसांपासून मला विदेशासह परराज्यातून धमकीचे कॉल आले आहेत. दाऊद व छोटा शकीलच्या नावांचा उल्लेख करत 'आपको मारना है' अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात येत आहेत. सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी खोडसाळपणा करत असेल पण सातत्याने फोन आल्याने मी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा राजकीय संबंध असेल असे मला वाटत नाही, मात्र पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे तथ्य बाहेर येईल. अशा धमक्या मला अनेक वेळा आल्या आहेत. त्यामुळे परिवारात कुठेही भीतीचे वातावरण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना सुचित केले आहे आणि आम्हीही आवश्यक ती काळजी घेत आहोत," अशी प्रतिक्रिया जीवे मारण्याची धमकीचे कॉल आल्याप्रकरणी एकनाथ खडसेंनी दिली. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे