शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

CoronaVirus: कोरोनाचा वाढता धोका; केंद्राच्या 'त्या' आकडेवारीनं वाढवली महाराष्ट्राची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 11:28 AM

CoronaVirus: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ

नवी दिल्ली: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे. यातील हजारपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातल्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन निर्णय घेतला. मात्र रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्क्यांहून अधिक जण मुंबईतले आहेत. लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असल्यानं मुंबईत कोरोना वेगानं हातपाय पसरतो आहे. अशातच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीमुळे राज्याची चिंता आणखी वाढली आहे.देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरदेखील जास्त आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या ५.९८ टक्के रुग्णांनी जीव गमावला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा विचार केल्यास हाच दर २.६६ टक्के इतका आहे. जागतिक पातळीवर हीच टक्केवारी ५.५८ इतकी आहे. त्यामुळेच राज्याच्या दृष्टीनं ही आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांचा विचार केल्यास कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. कर्नाटक (२.६४%), आंध्र प्रदेश (१.९२%), गोवा (०.०%), छत्तीसगड (०.०%), मध्य प्रदेश (५.४५%) अशी सध्याची आकडेवारी आहे. गुजरातमधील मृत्यूदर मात्र महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. गुजरातमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८.३४ टक्के जणांनी जीव गमावला आहे. उत्तरेतील राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा बरी आहे. उत्तर प्रदेश (०.९८%), बिहार (३.१२%), दिल्ली (१.३३%) अशी सध्याची स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस