शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ल्यातील तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: March 12, 2015 05:05 IST

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ मार्च महिन्यातही कमी झालेली नाही. बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईन फ्लूमुळे कुर्ला येथे

मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ मार्च महिन्यातही कमी झालेली नाही. बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईन फ्लूमुळे कुर्ला येथे राहणाऱ्या २७ वर्षीय मुलीचा स्वाईनमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृतांचा आकडा आठवर गेला असून मुंबई बाहेरील १५ रुग्णांचा आत्तापर्यंत स्वाईनमुळे मृत्यू झाला आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या मुलीला शनिवार, ७ मार्चला केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रविवार, ८ मार्चला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. या मुलीच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम झाला होता. तिचा ११ मार्चला मृत्यू झाला.मुंबईत बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईनचे ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १९ पुरूष तर २२ महिलांचा समावेश आहे. ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून ३६ जण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. मुंबईबाहेरून ४ नवे रुग्ण उपचारासाठी आले आहेत. तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)