शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वसतिगृहातील मुलीचा मृत्यू

By admin | Updated: October 7, 2016 21:57 IST

शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 07 -  शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. गेल्या चार दिवसांपासून रहस्यमयरित्या गायब झालेल्या ह्यत्याह्ण मुलीचा मृतदेह शहरातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ४ आॅक्टोबर रोजी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.बीड जिल्ह्यातील शितल अंकुश शिंदे (२१, रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) ही लातुरातील एका खाजगी वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याठी आली होती. दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी ती अचानक सकाळी ८.३० वाजता गायब झाली. याबाबत तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस आणि नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. संबंधित वसतिगृहातील कर्मचचारी आणि मुलींकडेही चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, या प्रकरणात संशय वाढू लागला. कुटुंबियांनी आपल्या मुलीचा शोध लावावा, यासाठी पोलिसांकडे तगादा लावला. शुक्रवारी गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका जुन्या विहिरीत शितल शिंदे या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अभ्यासाच्या धास्तीने आत्महत्या?स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शितल ही लातुरात आलीी होती. ती सध्याला एका खाजगी वसतिगृहात राहत होती. अभ्यासाच्या धास्तीने तिने आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. तर मुलीच्या मृत्यूबाबत अधिक चौकशी केली असता, सध्याला संशयास्पद बाबी आढळून आल्या नाहीत. मात्र, या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करणार आहे. या संशयास्पद मृत्यूबाबत नातेवाईकांची सध्याला तक्रार नाही, असे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोनि. गजानन भातलवंडे यांनी सांगितले. शितल ही शेतकरी कुटुंबातील असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती लातुरात आली होती. ४ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच अचचानक गायब झाल्याने तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे.