शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानके हस्तांतरास मार्चची डेडलाइन

By admin | Updated: December 4, 2014 02:51 IST

सायबर सिटीतील सिडकोच्या ताब्यातील सर्व रेल्वे स्थानके देखभालीसाठी रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

नवी मुंबई : सायबर सिटीतील सिडकोच्या ताब्यातील सर्व रेल्वे स्थानके देखभालीसाठी रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हस्तांरणाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्या टप्प्यात हार्बर मार्गावरील एक स्थानक हस्तांतरित करण्याची योजना आहे. तशा आशयाचा प्रस्ताव रेल्वेकडून सिडकोला प्राप्त झाला आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व स्थानकांचे हस्तांतर केले जाणार आहे. त्यासाठी आगामी वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आल्याचे समजते.नवी मुंबईतील वाशी-पनवेल मार्गावर दहा तर वाशी-ठाणे ट्रान्स मार्गावर पाच अशी एकूण पंधरा रेल्वे स्थानके आहेत. ही सर्व स्थानके रेल्वे आणि सिडकोने संयुक्तरीत्या उभारली आहेत. या स्थानकांच्या उभारणीसाठी आलेल्या एकूण खर्चात सिडकोचा वाटा ६७ टक्के आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ही स्थानके सिडकोच्या ताब्यात आहेत. असे असले तरी या स्थानकांची म्हणावी तशी डागडुजी होत नाही. ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांचे मार्च २0१५ पूर्वी रेल्वेकडे हस्तांतरण केले जाईल.