शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

दाऊदच्या तीन मालमत्ता विकल्या, ११ कोटींची बोली : सैफी बु-हाणी ट्रस्टकडून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:35 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली.

जमीर काझी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली. दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) सर्वोच्च बोली लावली.आठ वर्षांत केंद्रीय वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मुंबईतील मालमत्ता विकण्यासाठी चार वेळा लिलाव प्रक्रिया घेतली होती. मात्र, दहशतीमुळे खरेदीदार पुुढे येत नव्हते.मंगळवारी चर्चगेट येथील आयएमसीच्या इमारतीत किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये आॅनलाइन पद्धतीने लिलाव झाला. ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅन्युप्युलेटर्स (एसएएफईएमए) अधिनियम १९७६ च्या अन्वये ही प्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी हॉटेल अफरोजसाठी ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांनी सर्वोच्च बोली लावली होती. मात्र, त्यांना निर्धारित मुदतीत पूर्ण रक्कम भरता आली नव्हती.मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने जप्त केल्या आहेत. त्यांची टप्प्याटप्प्याने विक्री केली जात आहे.तीन आठवड्यांमध्ये उर्वरित रकमेचाभरणा केल्यानंतर, या मालमत्ता ‘एसबीयूटी’च्या नावावर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.बोली जिंकण्यात चक्रपाणी अपयशीहॉटेल रौनकच्या खरेदीसाठी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी लिलावात सहभागी झाले होते. मात्र, ते बोली जिंकण्यात अपयशी ठरले. चक्रपाणी यांनी मागील लिलावात दाऊदच्या मालकीची मोटार ३२ हजाराला विकत घेतली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन दहशतवादाचा निषेध म्हणून ती जाळली होती. दाऊदचे हॉटेल विकत घेऊन तेथे सार्वजनिक शौचालय उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.बुºहानी ट्रस्ट कोणाचा?दाऊदी बोहरा समाजातर्फे सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) चालविला जातो. त्याचे मुख्यालय भेंडीबाजार परिसरात आहे. सैय्यदना मोहम्मद बुराणी यांची शिकवण व मार्गदर्शनाखाली या ट्रस्टची स्थापना झाली आहे. ट्रस्टकडून भेंडीबाजार पुनर्वसनाचा प्रकल्प राबविला जात आहे. संबंधित मालमत्ता पुनर्वसन प्रकल्पात येत असल्याने, एसबीयूटीने लिलावात सहभाग घेतला.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई