दावोस करारांतून दिसला शक्तिशाली महाराष्ट्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:38 IST2025-01-24T07:37:51+5:302025-01-24T07:38:19+5:30
Devendra Fadnavis News: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

दावोस करारांतून दिसला शक्तिशाली महाराष्ट्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
मुंबई - दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात झालेली ही विक्रमी गुंतवणूक म्हणजे भारत आणि महाराष्ट्राची ताकद वाढत असल्याचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के थेट विदेशी गुंतवणूक असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या गुंतवणूक करारांपैकी ९५ टक्के करार हे प्रत्यक्षात आले, असेही त्यांनी सांगितले.
करारांसाठी दावोसच का ?
दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील कंपन्यांचे सीईओ जागतिक आर्थिक परिषदेसाठी येथे येतात. भारतीय कंपन्यांसोबतचे भागीदार हे परदेशातील आहेत.
त्यामुळे परदेशातील भागीदारांबरोबर दावोसमध्ये करार व्हावेत, अशी या कंपन्यांची इच्छा असते, असे सांगत फडणवीसांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिले. नवी मुंबईत एआय आधारित इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचेही ते म्हणाले.