शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

डरॉँव ऽऽ डरॉँव ऽऽ निषेध.. निषेध !

By admin | Updated: October 7, 2014 13:53 IST

बक्याच्या काठावर बेडकांचा घोळका जमलेला. अत्यंत गहन विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी, तातडीनं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वांचेच डोळे मोठे झालेले. तसं ते नेहमीच असतात; हा भाग वेगळा!)

होऊ दे चर्चा...

(स्थळ : डबक्याच्या काठावर बेडकांचा घोळका जमलेला. अत्यंत गहन विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी, तातडीनं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वांचेच डोळे मोठे झालेले. तसं ते नेहमीच असतात; हा भाग वेगळा!)पहिला बेडूक : (नेहमीप्रमाणं खच्चून ओरडत) डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. आज इथं तमाम 'मंडूक'बांधवांना का बोलावलंय, हे सर्वांच्या लक्षात आलं असेलच.दुसरा बेडूक : (मागच्या पायानं चिखल झाडत) होय. होय. सध्या 'मानव'जातीकडून आपला 'मंडूकवंश' नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय.तिसरा बेडूक : (रागारागानं जीभ बाहेर काढून पुन्हा पटकन आत घेत) म्हणूनच तमाम मानवांचा निषेध करण्यासाठी ही तातडीची मीटिंग बोलाविण्यात आलीय. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध. चौथा बेडूक : (जोरजोरात उड्या मारत) थांबा. तीनशे रुपये मिळाले की, कोणत्याही सभेत जाऊन घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांप्रमाणं उगाच अतिउत्साही होऊ नका.बेडकीण : (छोट्या पिलांना आपल्या पोटाच्या पदराखाली झाकत) त्या मानवांनी आता परत काय केलं ? ्रआपल्या भाईबंदाना पुन्हा त्यांच्या प्रयोगशाळेत नेलं की काय? पहिला बेडूक : (भल्या मोठय़ा घशातून छोट्या माशाचा आवंढा गिळत) त्या मानवांनी विज्ञानात प्रगती केली, ती केवळ आपल्या जीवावर. पोटं फाडली आपली..अन् पाठ थोपटून घेतली स्वत:ची.दुसरा बेडूक : (अंगावरचा चिखल झटकत) तरीही आपण डबक्यातल्या घाणीत शांत बसून रहिलो. वेळप्रसंगी अंगावर चिखलही ओढवून घेतला.तिसरा बेडूक : (डोळे गरागरा फिरवत) पण, ही राजकीय बदनामीची राळ मात्र आता सहन करण्यापलीकडची.चौथा बेडूक : (चित्रविचित्र आवाज करत) काल-परवा म्हणे, कुणी 'रेल्वे इंजिन'वाल्या नेत्यानं नेहमीच्या तिखट 'राज'कीय शैलीत विरोधकांवर टीका करताना त्यांना चक्क आपली उपमा दिली. 'ते विरोधक म्हणे आपल्यासारखं डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ करतात.' कित्ती मोठ्ठा हा आपला अपमान ?छोटा बेडूक : (दगडाच्या कपारीतून हळूच बाहेर येत) विरोधकाची टिंगल करताना त्या 'राज'नं म्हणे स्वत:ची इवलीशी 'बेटकुळी'ही दाखविली. अगं आईऽऽ 'बेटकुळी' म्हणजे कोणत्या जातीच्या 'बेडकाची कुळी' गं?पहिला बेडूक : (त्वेषानं स्वत:चं पोट फुगवत) त्या नेत्याच्या 'बेटकुळी'पेक्षा माझी 'बेडूककुळी' कितीतरी मोठ्ठी. बेडकीण : (चिडून पाण्यात सूर मारून) हेच ते. इथंच तर चुकतोय आपण. आपली कुवत माहीत नसताना मोठ-मोठी स्पर्धा करायची सवय लागलीय तुम्हाला त्या उमेदवारांसारखी. डबक्याबाहेरचं जग माहीत नाही आपल्याला; अन् बाता तर बैलाच्या आकाराएवढय़ा. यामुळंच तर इतर नेत्यांशी तुलना केल्यानं होतेय आपली घोर बदनामी .सारे बेडूक : (एक सुरात) म्हणूनच माणसांच्या 'कुपमंडूक' वृत्तीचा निषेध असो. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध.

- सचिन जवळकोटे