शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

धोकादायक इमारतींचा आदेश ‘एफएसआय’च्या वादात, नवीन आदेशात भाडेकरूंना मोठ्या सवलती - गृहनिर्माणमंत्री मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:36 IST

भाडेकरूंनी व्याप्त धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी किती एफएसआय द्यायचा यावर निर्णय होत नसल्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याचा काढलेला आदेश मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र त्यात सुधारणा करून तातडीने आदेश काढण्याचे सांगण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी लोकमतशी बोलताना दिली.

- अतुल कुलकणीमुंबई : भाडेकरूंनी व्याप्त धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी किती एफएसआय द्यायचा यावर निर्णय होत नसल्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याचा काढलेला आदेश मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र त्यात सुधारणा करून तातडीने आदेश काढण्याचे सांगण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी लोकमतशी बोलताना दिली. या निर्णयामुळे उपनगरातल्या भाडेकरूव्याप्त जागांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. नव्या नियमानुसार आता महापालिकेकडून पडताळणी केलेल्या यादीनुसारच भाडेकरूंना पुनर्रचित इमारतीत सदनिका मिळतील, या योजनेअंतर्गत मिळणारा एफएसआय त्याच भूखंडावर वापरावा लागेल.ज्या प्लॉटवर फक्त भाडेकरूव्याप्त इमारत आहे तेथील मूळ भाडेकरूंच्या पुनर्विकासासाठीचा एफएसआय अधिक ५० टक्के प्रोत्साहनात्मक एफएसआय किंवा ३ एफएसआय यापैकी जो जास्त असेल तो एफएसआय देण्यात येईल, अशी सुधारणा करण्याचा आग्रह मंत्री मेहता यांनी धरला आहे. बदल करूनच नवीन आदेश काढला जाईल, सर्व भाडेकरूंना नवीन इमारतीत सामावून घ्यावे, असे बंधनही करणार असल्याची माहिती मंत्री मेहता यांनी दिली.मुंबई उपनगरातील अधिकृत भाडेकरूव्याप्त धोकादायक जाहीर केलेल्या किंवा त्याच कारणामुळे पाडलेल्या इमारत पुनर्विकासासाठी इमारत मालक किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेला अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा यासाठी नव्याने विकास नियंत्रण नियमावलीच्या ३३(७)(ए) मध्ये नव्याने तरतुदी करण्यात आल्या आहेत.पुनर्विकासासाठी ७० टक्के संमतीची अटनव्या बदलानुसार पुनर्विकासासाठी ७० टक्के संमतीची अट असेल, सर्व भाडेकरूंना नवीन इमारतीत सामावून घ्यावे लागेल, प्रत्येक भाडेकरूला त्यांचे पूर्वीचे क्षेत्र ३०० चौ.फू.पेक्षा कमी असेल तर किमान ३०० चौ.फू. चे घर विनामोबदला दिले जाईल तसेच ज्या भाडेकरूंना पूर्वीचे घर ३०० चौ.फू. पेक्षा जास्त असेल त्यांना तेवढ्याच क्षेत्राचे घर दिले जाईल. त्यात ७५३ चौ.फू. पर्यंतचे घर विनामोबदला असेल. त्यापेक्षा मोठे घर जर पूर्वीचे असेल तर त्यापुढील क्षेत्रासाठी बांधकाम खर्च भाडेकरूकडून वसूल केला जाईल.पुनर्वसन भागासाठी वापरण्यात येणारा फंजिबल एफएसआय खुल्या विक्रीसाठी वापरता येणार नाही. पुनर्वसनाच्या काळात भाडेकरूंना तात्पुरत्या निवासासाठी त्याच भूखंडावर तात्पुरते संक्रमण शिबिर बांधण्यास परवानगी देण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. इमारत मालक, भाडेकरूंची सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी इमारत पाडल्यापासून एक वर्षाच्या आत काम सुरू करणे व ५ वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन यात घातले गेले आहे.

टॅग्स :Prakash Mehtaप्रकाश मेहताMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबई