शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दहीहंडीचा जल्लोष, गोविंदाच्या मृत्यूने गालबोट; पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 6:11 AM

‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला.

मुंबई/ठाणे : ‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसहठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांत आलेली मरगळ झटकत गोविंदांनी नऊ थरांची सलामी दिली.पावसाने दडी मारल्याने त्यांचा विरस झाला असला, तरी कृत्रिम फवाऱ्यांनी त्याची कसर भरून काढली. हंडीच्या थरावरून पडून एका गोविंदाचा झालेला मृत्यू व वेगवेगळ्या दुर्घटनांत १५० गोविंदा जखमी झाल्याने उत्सवाच्या उत्साहाला काहीसे गालबोट लागले. बहुतेक आयोजकांनी पाच थरांची मर्यादा ठेवत, दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी केली.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत यंदाही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिक हंड्यांचे आयोजन केल्याचे दिसले. पारितोषिकाच्या रकमेत यंदाही आयोजकांनी आखडता हात घेतला.काही मंडळांनी बक्षिसांच्या रकमेत कपात करत, संबंधित रक्कम केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याची घोषणा करत सामाजिक बांधिलकी जपली. हंडी फोडण्यासाठी १४ वर्षांवरील गोविंदांची निवड, हंडी फोडणाºया गोविंदाला सेफ्टी हेल्मेट-जॅकेट- सुरक्षेचा दोर अशा विविध सुरक्षा साधनांना आयोजकांसह गोविंदा पथकांनी प्राधान्य दिले.एका गोविंदाचा मृत्यूधारावीतील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात कुश खंदारे या २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. पहिल्या थरावर चढताना त्याला आकडी आली. त्याला उपचारांसाठी त्वरित सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.जय जवानचे नऊ थर :स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने अत्यंत सफाईदारपणे नऊथर रचून सलामी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.149 एकूण जखमी गोविंदा70 उपचार घेणारे79 उपचार घेऊन घरी गेलेले

टॅग्स :Dahi Handiदही हंडीMumbaiमुंबईthaneठाणे