शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"दादांचा अपघात नव्हे १०० टक्के घात...! रनवे ११ च का मागितला?"; रोहित पवारांचे गंभीर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 21:33 IST

रनवे एकोणतीस असताना, सुरक्षित असताना, फ्लॅट असताना, कुठलेही टेन्शन तेथे नसताना, तेथे सूर्याचा पण त्रास नसताना सारखे सारखे 'मला रनवे ११ पाहिजेल,' असे त्याठिकाणी सांगण्यात आले. असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नेमका कसा झाला? यासंदर्भात अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आज त्यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी, मुंबईत पत्रकार परिषद घेत, पीपीटीच्या माध्यमाने, अजित दादा यांच्या विमान अपघातासंदर्भात, "मला असे वाटते की, हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो," असे म्हणत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

जर टेक ऑफ पुण्याचे एअरपोर्ट बॅकअप पकडून केले असेल, तर तेथे लँड करण्याचा प्रयत्न का झाला? -त्यामुळे दादांचा दौरा का बदलला? विमानाची वेळ बदलली गेली का? पायलट खरंच बदलले का? का बदलले? असे काही प्रश्न आहे. मग त्यानंतर, केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का आणि या अहवालामध्ये विसंगती आली का? त्याच्यामध्ये फरक आलेला आहे. मधील वेळेची विसंगती का आली? पायलट रडाच्या एक मिनिट आधीच तो ट्रान्सपॉन्डर का बंद झाला? की बंद केला गेला? व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झाले? जर टेक ऑफ पुण्याचे एअरपोर्ट बॅकअप पकडून केले असेल तर तेथे लँड करण्याचा प्रयत्न का झाला? असे अनेक गंभीर प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. 

रनवे ११ च का मागितला? -दरम्यान, रनवे एकोणतीस असताना, सुरक्षित असताना, फ्लॅट असताना, कुठलेही टेन्शन तेथे नसताना, तेथे सूर्याचा पण त्रास नसताना सारखे सारखे 'मला रनवे ११ पाहिजेल,' असे त्याठिकाणी सांगण्यात आले. असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

'हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो -आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात जो मुख्य पायलट आहे, एवढी घटना, जमीन जवळ येतीये, विमान टिल्ट होतेय, तिथे बंद पडतेय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ काढ गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून नाहीतर सामान्य व्यक्ती ज्याचे कुठलेट टेक्निकल बॅग्राउंड नाही, मला असे वाटते की 'हा अपघात नाही, हा १०० टक्के घात असू शकतो आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या तपास संस्थांकडून हवी आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस